पुणे

पुण्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट BQ.1 ची एन्ट्री, दिवाळीच्या तोंडावर कोरोनाने वाढवली चिंता

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी पूर्णपणे नष्ट झालेला नाहीये. अनेक देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढतआहेत. यामागे कोरोनाचा एक नवा व्हेरियंट असल्याचं समोर आलं असून ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट आढळला आहे. चिंतेची बाब म्हणजे पुण्यात या BQ1 व्हेरियंटची एन्ट्री झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पुण्यात ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट BQ1चा रुग्ण आढळला आहे. याआधी गुजरातमध्ये BF.7 व्हेरियंट सापडला होता. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, BQ1 आणि BF.7 या दोन्ही व्हेरियंटचे म्युटेशन होतं. ज्यामुळे शरिरातील रोग प्रतिकारशक्ती कमी होते. BQ.1 आणि BQ.1.1 हे ओमिक्रॉनच्या BA.5 सबव्हेरियंटचे दोन उपप्रकार आहेत. हे दोन्ही उपप्रकार धोकादायक असल्याचं बोललं जातं. अमेरिकेतील कोरोनाच्या सर्व सक्रिय प्रकरणांपैकी १०% पेक्षा जास्त प्रकरणे या उपप्रकारांमुळे असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सोमवारी २०१ रुग्ण आढळले होते. तर, रुग्ण वाढीचा दर १.८२ टक्के इतका होता. पुण्यात २३ नवीन रुग्ण आढळले आहेत. ठाणे, रायगड आणि मुंबई या तीन शहरात रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी दिवाळीत योग्य ती काळजी घ्यावी. तसंच, सर्दी-ताप अशी लक्षणे आढळल्यास वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृद्धांनी काही दिवस गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago