पुणे

पुणे : नोकरी न मिळण्याच्या भीतीने इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

पुणे : एका तरुण अभियंत्याने सुसगाव येथे नोकरीसाठी जागा न मिळण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (21) असे मृताचे नाव असून तो माउंट युनिक सोसायटी, ऑडी शोरूमच्या मागे, सुसगाव येथे राहणारा आहे. आज (15 जुलै) पहाटेच्या सुमारास त्याने सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली.

माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात नोकरी मिळणार नाही या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी औंध रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अक्षय हा कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. अक्षय आई-बाबा आणि बहिणीसह सुसगाव परिसरात राहतो. अक्षय हा कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो शिक्षण घेत होता. मात्र अचानक त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. नोकरीचा पर्याय नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मी अपयशी ठरलो आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही, असे पत्रात उल्लेख करत अक्षयने आत्महत्या केली. नोकरीच्या भीतीसह आणखी काही कारण आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago