पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव या गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाने बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली आणि बैल पळत सुटला. ती दोरी मुलाभोवती गुंडाळली गेली आणि दोरीबरोबर मुलगा देखील फरपटत गेला. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. शौर्य शैलेश वागस्कर (वय ८) असं मृत्यू झालेल्या चिमुलकल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शौर्य अंगणात खेळत होता. यावेळी त्याने अंगणातील बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली. त्यानंतर बैल पळत सुटला आणि ही दोरी शौर्यच्या गळ्याभोवती आणि शरीराभोवती गुंडाळली गेली. काही अंतरापर्यंत त्याला बैलाने फरपटत नेले. त्यात तो गंभीर जखमी झाला. घटना घडली त्यावेळी शौर्यचे पालक घरात होते. बाहेरून आवाज आल्याने ते धावत बाहेर आले. यावेळी शौर्यला त्यांनी जखमी अवस्थेत पाहिले. त्यांनी तात्काळ शौर्यला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शौर्य फुलगाव येथील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तर घरात तो एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…