पुणे

डॉ. कीर्ती शैलेश जळकोटे यांनी ग्रेसफुल मेडिक्वीन टायटल जिंकलं..

पुणे : मेडिक्वीन मेडिको पिजंट तर्फे डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर यांच्याकडून मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिला डॉक्टरांसाठी सौन्दर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे दुसरे पर्व होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे ३०० महिला डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. त्यातून ४० स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले. या स्पर्धकांमधून ६ विजेते घोषित करण्यात आले. पुण्याच्या डॉ. कीर्ती शैलेश जळकोटे यांनी ग्रेसफुल मेडिक्वीन टायटल जिंकलं. पुण्यातील बालेवाडी येथील ऑर्किड हॉटेल मध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, डॉ. कांचन मदार, डॉ. मीनाक्षी देसाई, डॉ. अश्विनी पाटील, पूजा वाघ मिस इंडिया इंटरनॅशनल दुबई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या समन्वयक म्हणून प्राजक्ता शहा यांनी काम पाहिले. योगेश पवार यांनी कोरीओग्राफर म्हणून काम पाहिले.

व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रेरणा बेरी – कालेकर म्हणाल्या कि, मेडिक्वीन हि केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून यामध्ये सहभागी डॉक्टरांचा सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रातील काम, कलागुण, फिटनेस, छंद , वैयक्तिक कामगिरी या अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. “निरामया”, प्रत्येक स्री आरोग्यपूर्ण हा उद्देश घेऊन सर्व सहभागी डॉक्टर काम करतात.

डॉ. कीर्ती जळकोटे या नंतर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “मॉडेलिंग किंवा अभिनय क्षेत्रात न जाता टायटल चा उपयोग वैद्य म्हणून आरोग्य सेवा देत, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर काम करेन. डॉ. कीर्ती जळकोटे ह्या पुणे येथे आयुर्वेदिक सल्लागार, पंचकर्म तज्ञ म्हणून काम पाहतात. त्यांनी यापूर्वी हृदयरोग, डायबेटीस, सांधेदुखी यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago