पुणे

आंबील ओढ्यालगतची अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती

पुणे : आंबील ओढ्यालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून तात्काळ कारवाई थांबवण्यात आली आहे. दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३३ येथील आंबील ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं केली आहेत. अशा परिस्थितीत पावसाळ्यात या परिसरात पाणी तुंबते, त्यामुळे येथील अतिक्रमणं हटविण्याची नोटीस पुणे महापालिकेने काढली होती. त्यानुसार आजपासून कारवाई सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. त्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आंबील ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न असून त्यात लोकप्रतिनिधींचा हात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. महापालिकेनं कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यानंतर वातावरण तापले आणि पोलीस व स्थानिकांमध्ये जोरदार झटापट झाली. नागरिक मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळं या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, हनुमंत फडके यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी काही कागदपत्रेही कोर्टात सादर केली. त्यानंतर या प्रकरणावर तातडीची सुनावणी झाली आणि न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत कारवाईला स्थगिती दिली. त्याबरोबरच महापालिकेकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागवले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago