पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी शुक्रवारी सकाळी बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही स्फोटके नक्की कोणत्या स्वरुपाची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले आहे. तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पुणे रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली जात आहे. बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक याठिकाणी हजर आहे. यावेळी अमिताभ गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सकाळी साडेदहा वाजता रेल्वे स्थानकावर स्फोटकसदृश वस्तू आढळून आल्या. प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरु आहे. या घटनेनंतर पुणे पोलीस स्थानकाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…