Audio clip of Vaishnavi Hagavane before her suicide went-viral
पुणे : सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. तर सासरा आणि दीर फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
अटक झालेले आरोपी
शशांक राजेंद्र हगवणे (पती)
लता राजेंद्र हगवणे (सासू)
करिश्मा राजेंद्र हगवणे (नणंद)
फरार आरोपी
राजेंद्र तुकाराम हगवणे (सासरा)
सुशील राजेंद्र हगवणे (दीर)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे हिला सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी वैष्णवीने आपल्या एका जवळच्या मैत्रिणीकडे हा त्रास कथितपणे उघड केला होता, ज्यामुळे पोलिस तपासाला महत्त्वाचा आधार मिळाला आहे.
वैष्णवी हगवणे हिची तिच्या मैत्रिणीसोबत संभाषणाची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी हगवणे तिच्या मैत्रिणीला सासरच्यांकडून अमानुष छळ सुरु असल्याचं सांगत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. सासरच्या मंडळीकडून आपला अमानुष छळ होतोय. याबद्दल वैष्णवी यांनी आपल्या मैत्रिणीशी चॅट केलं होतं. आपण सगळ्यांना विरोध करून लग्न केलं. पण हीच आपली मोठी चूक झाल्याचं वैष्णवी मैत्रिणीला सांगत होती. वैष्णवीने आपल्या मैत्रिणीसोबत चॅट केलं आहे. या चॅट दरम्यान तिने व्हॉईस मेसेज पाठवलेले आहेत. त्याच व्हॉईस मेसेजची ऑडिओ क्लिप आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.
वैष्णवी मेसेजमध्ये काय-काय म्हणाली?
वैष्णवी: तेच कामवालीचं मॅटर… तिची लफडी बाहेर आली… मावशीने मला बरंच सांगितलं होतं फॅमिलीबद्दल… त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्यांना साथ दिली बोलू लागयाला आणि मी वाटोळं केलंय घराचं… पण माझा काही संबंधच नव्हता… मी आलीये माहेरी, माझे वडील खूप चिडले आहेत सगळे.
मैत्रीण: पण तुझी काय चुकी यामध्ये… तुझा तर काहीच रोल नाही?
वैष्णवी: मी वैतागले खूप.
मैत्रीण: कोणी मारलं आणि तुला?
वैष्णवी: पिंकीने.
मैत्रीण: अगं, पण एवढं कोणी मारतं का गं असं?
वैष्णवी: माझ्यावरती पण आरोप करायला लागली. मला म्हणते, आता तुझी इकडे सगळीकडे बदनामी करते. तू जे केलं आहे किंवा नाही केलंय, म्हणजे इकडे वाकडला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की, तू कसली घाणेरडी आहे. घराचे वाटोळे करते. पती शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हतीस. असं तसं. म्हणे, तू फाल्तू आहे, घाणेरडी आहे, घाण घाण शिव्या द्यायला लागली. पप्पांना-मम्मींना काहीही बोलायला लागली नुसतं, अगं काय सांगू तुला. पप्पा बसले होते म्हणून मला तुझ्याशी बोलता आलं नाही.
वैष्णवी: मला मारताना तुझे दाजी (वैष्णवीचा पती) बघत होते. त्यानंतर त्यांनीही माझ्यावर हात उचलला. हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे की, मी त्या माणसाला डिव्होस देणार. मी पप्पांना सांगितलं आहे. पप्पा म्हणाले की, आपण त्यावर विचार करुया.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…