पुणे

पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधायुक्त क्रीडा विद्यापीठ उभारणार

पुणे : महाराष्ट्र शासन खेळाला महत्व देत असून शहरी आणि ग्रामीण भागात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाच्या पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविण्यासाठी पुण्यामध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. यामुळे खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध होतील आणि आपले क्रीडाकौशल्य विकसीत करण्याची संधी मिळेल, या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असे प्रतिपादन क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीही खेळाडूंनी आपला सराव सुरू ठेवत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळालाही महत्व देण्याची गरज आहे. खेळात संघभावनेच्या साहाय्याने यश संपादन करता येते. खेळामुळे निकोप स्पर्धा करण्याची सवय लागते आणि व्यक्तिमत्त्व विकसित होते. खेळाची आवड असल्याने खेळाडूंमध्ये येऊन शाळा आणि महाविद्यालयाचे दिवस आठवल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नल गिल म्हणाले, जीवनात खेळाला महत्व आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. मेहनत आणि सतत प्रयत्न ही यशाची गुरुकिल्ली आहे. खेळाच्या माध्यमातून शिक्षण आणि शिक्षणातून करिअर घडवायची संधी सर्वांना मिळाली आहे. या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्वाला आकार द्यावा.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, खेळासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. खेळातून राष्ट्र निर्माण ही व्यवस्थापनाची इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आणि कर्नल देवराज गील यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते श पद्माकर फड यांनी प्रास्ताविक केले. एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे पुरुष आणि महिलांसाठी घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालय स्पर्धेत क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कबड्डी, रोईंग, टेनिस, जलतरण, वॉटरपोलो, ऍथलेटिक, क्रॉस कंट्री, बॉक्सिंग, धनुर्विद्या या एकूण १६ खेळ प्रकारात सामने खेळविण्यात आले होते. यात एकूण ११२५ खेळाडूंनी सहभाग घेतला अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट पुणेचे कमांडंट कर्नल देवराज गील, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, मिटकॉम् च्या संचालिका डॉ. सुनिता कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, विद्यार्थी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र पुजेरी, एमआयटी क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड आदी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

16 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago