Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar infected with corona
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेफीकीरपणे वागणाऱ्या नागरिकांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली.
‘करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन केले पाहिजे. अनेक नागरिक हे मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतात. तसेच रस्त्यांवर थुंकण्याचेही प्रकार केले जातात. त्यांच्याविरूद्ध कारवाईसाठी महापालिका आणि पोलिस विभागांनी मोहीम सुरू करावी. मास्क न घातल्यास पाचशे रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड वसूल करा’, असे आदेश अजित पवार यांनी दिले.
’नागरिकांनी नियमांचे पालन करणे हे सर्वांच्या हिताचे आहे. सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्या नागरिकांविरूद्ध कारवाई करण्यात यावी. करोनाविरूद्धची लढाई ही सर्वांचीच आहे. त्यासाठी नागरिकांनी साथ देणे आवश्यक आहे,’ असे पवार म्हणाले. ‘करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना उपचारांबाबत तज्ज्ञ डॉक्टर आणि टास्क फोर्समार्फत प्रशिक्षण देण्यात यावे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांना उपचाराबाबतच्या सुविधा देण्याची दक्षता घ्यावी,’ असेही अजित पवार म्हणाले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…