A terrible accident in Pune! A mixer container collided with several vehicles, killing one and injuring 3
पुणे : पुण्यातील हडपसर येथे एका मिक्सर कंटेनरची चार रिक्षा आणि कारला जोरदार धडक बसली. त्यानंतर कंटेनर एका झाडाला धडकून पलटी झाला. हे झाड कोसळून एका व्यक्तीच्या अंगावर पडले. या भीषण अपघातात १ व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि कारला जोरदार धडक दिली असून या भीषण अपघातात १ व्यक्तीचा मृत्यू झाला तर ३ जखमी झाले आहेत. सकाळी ६ वाजताच्या सुमारास हडपसर येथील गाडीतळ येथे हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर एका झाडाला धडकून पलटी झाला आणि ते झाडही कोसळून एका नागरिकाच्या अंगावर पडले. कंटेनर खाली रिक्षा आल्याने तिचादेखील चक्काचूर झाला. सध्या क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…