पुणे

पुण्यात खळबळ! १७ वर्षाच्या मुलाची भररस्त्यात चॉपरने वार करून हत्या

17 year old boy killed in chopper attack in Pune

पुणे : पुण्यातील रामटेकडी परिसरात मंगळवारी (३ डिसेंबर) सकाळी झालेल्या एका प्राणघातक हल्ल्यात १७ वर्षीय यश सुनील घाटे या तरुणाचा मृत्यू झाला. हल्ला जुन्या वादातून करण्यात आला होता. याप्रकरणी, पोलिसांनी साहिल लतीफ शेख (18) आणि ताहीर खलील पठाण (18, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथील जामा मशिदीजवळ सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वानवडी येथील यश हा त्याचा मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण आणि श्रेयस शिंदे यांच्यासोबत कॉलेजकडे जात असताना मागून आलेल्या दोन आरोपींनी त्याच्यावर चॉपरने वार केले. या हल्ल्यात यश गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत गुन्ह्याच्या काही तासांतच दोन आरोपींना पकडले. पोलिसांनी सांगितले कि, यश आणि आरोपी यांच्यातील पूर्वीच्या भांडणातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते. आरोपींची पुढील चौकशी सुरू असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago