पुणे

पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात, कंटेनरने धडक दिल्यामुळे 48 गाड्या एकमेकांवर आदळल्या

पुणे : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. आज रात्री नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. कंटेनरने धडक दिल्यामुळे 48 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली आहे. अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार नवले ब्रिजवर नर्हे नजीकच्या परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एकूण 48 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस काही नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

नवले पुलावर अपघातांचे सत्र
नवले पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत शेकडो लोकांना या अपघातांमध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे. सतत होणाऱ्या या अपघातांकडे महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नसून अपघातांचे सत्र सुरूच आहे. या ठिकाणी अपघातांमधे सतत होणारी जिवितहानी चिंताजनक बाब आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

7 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago