पुणे

21 ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिन 2022 : पोलीस हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे : दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणुन देशभर पाळला जातो. या दिवशी संपुर्ण वर्षात आपले कर्तव्य बजावत असताना कामी आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली वाहण्यात येते. हा दिवस पोलीस दलाला अभिमानाचा, शौर्याला मानवंदना देण्याचा, त्याचबरोबर आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या स्मृतीने मन हेलावणाराही असतो.

21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणुन पाळला जाण्यास 1959 मध्ये लडाख भागातील सरहद्दीवर झालेली घटना कारणीभुत ठरली. भारत चीन सरहद्दीवर लडाख भागात 18 हजार फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज नावाचे ठिकाण आहे. 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी हॉट स्प्रिंग्ज येथे गस्त चालु होती. गस्ती तुकडी नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी कुच करत हॉट स्प्रिंग्जच्या पुर्वेला 6 मैल दुर आली असता पर्वताच्या डाव्या बाजुला तुकडीच्या नेत्याला काही संशयास्पद खुणा दिसल्या. तुकडी त्या खुणांच्या अनुरोधाने पुढे चालु लागली आणि अचानक भयानक गोळीबार सुरू झाला. त्याठिकाणी पोलीस वीरांनी शौर्याने तोंड दिले. ही विशेष लढाई लढता-लढता यापैकी 10 गस्ती शिपायांना वीरमरण आले व 9 जण जखमी अवस्थेत शत्रुच्या हाती सापडले. हे 10 अमर शिपाई होते पुरणसिंग, धरमसिंग, इंगजित सुबा, नोरबु लामा, शिवनाथ प्रसाद, त्शेरिंग नोरबु, इमामसिंग, सवनसिंग, बेगराज आणि माखनलाल असे होते.

त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही अचानक चिनी सैन्यांनी हल्ला केला होता. या लढाईत कामी आलेल्या या शुर पोलीस जवानांपैकी पश्चिम बंगालचे-3, हरियाणा-2, पंजाब-2, उत्तर प्रदेश-2, हिमाचल प्रदेश-1 असे होते. ही बातमी वाऱ्यासारखी साऱ्या देशभर पसरली. 13 नोव्हेंबरला चिनी सैनिकांनी या हुतात्म्यांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. १४ नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता हॉट स्प्रिंग्ज येथे त्यांच्यावर सन्मानपुर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलांनी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रध्दांजली अर्पण केली.

त्यानंतर पाटणा येथे 1959 साली झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धांच्या वेळी सर्वांनी अशी शपथ घेतली कि, ‘आमच्या ह्या वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी 21 ऑक्टॉबरला पोलीस हुतात्मा दिन पाळुन करू’ आणि तेव्हापासुन दरवर्षी हा दिन भारतवर्षात मोठया सन्मानाने “पोलीस हुतात्मा दिन’ म्हणुन पाळण्यात येतो. राज्या-राज्यातुन पोलीस दले या हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजीत करून त्यांना मानवंदना देतात.

1 सप्टेंबर 2021 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार अशा एकुण 261 जवान यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले. डॉ. तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई) हे वरील हुतात्म्यांना दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस संशोधन केंद्र, पाषाण रोड, पुणे येथे श्रध्दांजली अर्पण करणार आहेत. सदर कार्यक्रमास पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी हजर राहणार आहेत. यावेळी नागरीक व प्रसार माध्यमांना आवाहन करण्यात आले आहे की, पोलीस हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आपण उपस्थित राहावे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago