महाराष्ट्र

पुणे : भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी

पुणे : पुणे-सातारा महामार्गावर बुधवारी (३० जुलै) सकाळी खेड शिवापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून एका जीप चालकास गंभीर दुखापत झाली आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने एकूण पाच वाहनांना धडक दिल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.

हा अपघात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. साताऱ्याकडे वेगात निघालेला मालवाहू ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि विरुद्ध दिशेच्या (पुणे लेन) मार्गावर घुसून पाच वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये दोन मोटारसायकली, एक जीप आणि इतर दोन वाहनांचा समावेश होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश महादेव रेडेकर (वय ३२, रा. पुणे) आणि दिव्यम सुनील निकम (वय ३१, रा. पुणे) हे दोघे एका मोटारसायकलवर प्रवास करत होते. ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच अपघातात संजय खटपे या जीप चालकास गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी सांगितले की, “ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने आधी एका कंटेनर वाहनाला, नंतर जीपला आणि नंतर दुचाकींना धडक दिली.” याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago