महाराष्ट्र

स्वच्छ व पारदर्शक कारभारसह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभारसह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य राहील, यासाठी विभागातील सर्वांचे सहकार्य लाभेल असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयात आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देसाई बोलत होते. मंत्रालयातील मुख्य इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर दालन क्र. 302 या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचे कार्यालय आहे. यावेळी खासदार हेमंत पाटील, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल बी. उमाप, देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई व कुटुंबिय उपस्थित होते.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री देसाई म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कार्य करीत आहोत. महाराष्ट्र राज्य देशाच्या विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे राज्य करण्याचे ध्येय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळगले आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपविलेली आहे. त्या विभागाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन ते परिपूर्ण करण्यासाठी माझा विभाग काम करेल.

राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्याला उत्पन्न मिळवून देण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. गेल्या वर्षी या विभागांनी 17 हजार 500 कोटी महसूल राज्याला मिळवून दिला आहे.राज्याला त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी विभागाच्यावतीने जे उद्दिष्ट दिले आहे त्या उद्दिष्टाप्रमाणे राज्याला उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही देसाई यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago