People showed BJP their 'place' - Rohit Pawar
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपला औरंगाबादसह पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे.
विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत महाविकास आघाडीचे अभिनंदन केले, तसेच भाजपला जोरदार टोला देखील लगावला. त्यांनी म्हटलं कि, “भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे. भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं महाविकासआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…