पुणे, ता. १३ : कोरोनाच्या आधीपासूनच तंबाखूच्या आहारी गेलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. सिगारेट ओढण्याचे आणि तंबाखू खाण्याचे प्रमाण कोरोनानंतर वाढल्याचे दिसून येते. यामुळे दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे आता तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाला दूर ठेवण्यासाठी ‘समर्थ विडा’ हा पर्याय ठरणार आहे.
डॉ. ललिता बोरा यांच्या तंबाखूला पर्याय ठरेल अशा ‘समर्थ विडा’ या अभिनव प्रयोगाला भारतीय स्वामी स्वामित्व हक्क पेटंट मिळाले आहे. यापूर्वी अनेकवेळा हर्बल तंबाखूचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. त्यामुळे समर्थ विडा हा भारतातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरणार आहे. साधारणत: ६० ते ७० टक्के लोकांमध्ये सिगारेट, हुक्का, बिडी तसेच तंबाखू खाण्याची सवय आहे ही गोष्ट लक्षात घेऊन तंबाखूमुक्त भारत संकल्पनेतून डॉ. ललिता बोरा यांनी प्रयत्न सुरू केले होते.
तंबाखूमुक्त होण्यासाठी हर्बल तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (तंबाखू, हर्बल सिगारेट, गुटखा, किमाम, हर्बल मीशेरी) विकसित केली आहे. डॉ. बोरा ह्या गेल्या २५ वर्षांपासून अन्न तंत्रज्ञा म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांनी अन्नशास्त्राचा बारकाईने विचार करून ‘समर्थ विडा’ विकसित केला आहे, असे त्यांनी सांगितले. तंबाखू सारखे दिसणारे व त्यांच्यासारखीच चव देणारे खाण्याचे पान व आयुर्वेदिक मसाले वापरून समर्थ विडा तयार करण्यात आला. यासाठी तंबाखू खाणाऱ्या तीन हजाराहून अधिक लोकांवर प्रयोग करण्यात आल्याचा दावा डॉ. बोरा यांनी केला आहे. त्यातील ८७ टक्के लोकांचे तंबाखूचे व्यसन सुटून आरोग्यही सुधारले आहे. या उत्पादनाला प्रयोगशाळेने मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतीय पेटंट देखील या उत्पादनाला मिळाले आहे.
— डॉ. ललिता बोरा, 9422500269
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…