महाराष्ट्र

७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 7 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधि सेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने दिली आहे.

राज्यातील सर्व खेड्यांपर्यंत मोफत विविध सेवा व विधि सेवेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, त्या योजनांमधील लाभार्थी याची माहिती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी विधि सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात जिल्हानिहाय, तालुकानिहाय कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, यामध्ये विधि साक्षरता शिबिरे, शासनाच्या विविध योजनांची माहिती, भित्तीपत्रके, अशा कार्यक्रमांचा समावेश असून, संबंधित कार्यालये जिल्हा विधि सेवा प्राधिकरणासोबत समन्वय साधून हे कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती राज्य विधि सेवा प्राधिकरण यांनी दिली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago