महाराष्ट्र

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मुंबई : कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५:३० पासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आयएनसीओआयएस) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४, रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमी, ठाणे जिल्ह्यात १४.३ आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २३ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १४.३, रायगड १०.७, रत्नागिरी २५.८, सिंधुदुर्ग ३६.४, पालघर ७३.३, नाशिक ६.२, धुळे ०.५, नंदुरबार २.९, जळगाव ०.९, अहिल्यानगर ०.२, पुणे ४.३, सोलापूर ०.१, सातारा ४.७, सांगली २.८, कोल्हापूर १३.९, छत्रपती संभाजीनगर १, जालना १.१, धाराशिव ०.२, नांदेड ०.३, हिंगोली ०.४, बुलढाणा १.१, अकोला ३.४, वाशिम ०.४ अमरावती ०.५, यवतमाळ ०.६, वर्धा ०.२, नागपूर १.५, भंडारा ०.६, गोंदिया १.७, चंद्रपूर २.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम
Tags: Boat Advisorybreaking newsDisaster ManagementDisaster ResponseEmergency AlertFishermen WarningFlood RiskFlood Updateheavy rainfallHigh Waves AlertIMD AlertINCOISIndian Monsoon 2025Konkan coastKonkan RainMaharashtra UpdatesMaharashtra weatherMonsoon NewsMumbai weatherOrange alertPalghar RainPune GhatsRaigad RainRain Alert 2025Rainfall updateRatnagiri RainSatara GhatsSea WarningSindhudurg RainThane RainWeather AlertWeather Bulletinआपत्कालीन इशाराआपत्ती प्रतिसादआपत्ती व्यवस्थापनआयएमडी अलर्टउंच लाटांचा इशाराऑरेंज अलर्टकोकण किनाराकोकण पाऊसठाणे पाऊसपालघर पाऊसपावसाचा इशारा २०२५पावसाचे अपडेटपुणे घाटपूर अपडेटपूर धोकाबोटीचा सल्लाब्रेकिंग न्यूजभारतीय मान्सून २०२५मच्छिमारांना इशारामहाराष्ट्र अपडेट्समहाराष्ट्र हवामानमान्सून बातम्यामुंबई हवामानमुसळधार पाऊसरत्नागिरी पाऊसरायगड पाऊससमुद्राचा इशारासातारा घाटसिंधुदुर्ग पाऊसहवामान बुलेटिनहवामानाचा इशारा

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago