prakash-ambedkar
मुंबई : डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला या पुतळ्याला विरोध असून ते पैसे कोविडसाठी खर्च करावे, असं म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले मी यापूर्वीपासून सांगतोय की पुतळ्याला माझा विरोध आहे. पुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं. आज त्याची अधिक गरज आहे. हा पैसा त्यासाठी वापरला तर अजून अनेकांचे जीव वाचवण्यास आपल्याला मदत होईल. करोनातून लोकांना वाचवणं ही सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे पुतळ्यावर खर्च करण्याऐवजी तो निधी करोनासाठी खर्च करावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. झी चोवीस तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.
पुतळ्याचं उद्घाटन यापूर्वीही झालं होतं. त्यामुळे पुन्हा उद्धाटनाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. सकाळपर्यंत मला त्याची जाणीव नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवून याचा निर्णय घ्यावा. इंदू मिलची जागा कशासाठी वापरावी, का वापरावी आणि त्याची देशाला गरज काय आहे, त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का द्यावं याची नोट अटल बिहारी वाजपेयी यांची आहे ती मुख्यमंत्र्यांनी वाचावी. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय केंद्र उभारावं. त्यासाठी सरकारवर कोणताही आर्थिक बोजा नाही. त्यासाठी लागणारा खर्च केंद्र सरकार देणार,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुतळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण जरी आलं तरी आपण त्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुतळ्याची गरज नाही. त्या नोटमधील संकल्पना गरजेची आहे असं मानत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: म्हणत होते. आपल्याला पुतळ्यांची गरज नाही माणसाची गरज आहे. आपल्याला विचारसरणीची गरज आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ही मानत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…