महाराष्ट्र

सुमारे 117.14 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

मुंबई : खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूलहानी करणाऱ्या करदाता मे पाकीजा स्टिल एलएलपी चे भागीदार आणि मे मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या पुरवठ्याशिवाय ९९.२७ कोटी रुपयांची बनावट बीजके प्राप्त करुन १७.८७ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळविल्याप्रकरणी सय्यद तैकीर हसन रिजवी या व्यक्तीस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी आज अटक केली आहे.

सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी मे. पाकीजा स्टिल एलएलपी आणि मे मायल स्टिल प्रा. लि. या दोन बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ९९.२७ कोटी रुपयांची खोटी खरेदीची बिजके प्राप्त केली आहेत. त्यातून या व्यक्तीने शासनाची सुमारे १७.८७ कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे. या व्यक्तीस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने ३ ऑगस्ट २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात अन्वेषण अधिकारी डॉ. विद्याधर जगताप, सहाय्यक राज्यकर आयुक्त हे मोहन चिखले, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या तपासासाठी अनिल भंडारी (भा.प्र.से), सहआयुक्त, अन्वेषण-क यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यवाहीसाठी प्रशांत खराडे आणि श्रीकांत पवार या सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि इतर राज्यकर निरीक्षक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. या अटकेसह आर्थिक वर्षातील सलग २८ अटक कारवाया महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने केल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago