अनैतिक संबंधातून पत्नी आणि भावाने केला तरुणाचा खून, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…

जालना : एका पत्नीने दिरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सुमारे एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 30 वर्षीय परमेश्वर तायडे यांच्या मृत्यूचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी परमेश्वर तायडे यांचा भाऊ ध्यानेश्वर तायडे (28) आणि पत्नी मनीषा तायडे (25) आणि यांना अटक करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामधील सोमठाणा गावात हे धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे.

परमेश्वर तायडे एक महिन्यापूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करून शोध सुरू असल्याचे भासवले. मात्र बुधवारी गावातील तलावात अज्ञात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. चौकशीदरम्यान कुटुंबीयांचे जबाब एकमेकांशी जुळत नसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. तपास पुढे जात असताना मनीषा आणि तिचा दिर ध्यानेश्वर यांचे अवैध संबंध असल्याचे उघडकीस आले. परमेश्वर यांनी या संबंधांना विरोध केला होता, ज्यामुळे खूनाचा कट रचल्याचे पोलिसांना आढळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबरच्या रात्री परमेश्वर तायडे झोपलेले असताना ध्यानेश्वरने परमेश्वरवर दगडाने हल्ला केला, तर मनीषाने त्याचा गळा दाबून हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी दोघांनी मृतदेह पॉलिथीनमध्ये गुंडाळला, त्याला दगड बांधले आणि जवळच्या जलाशयात फेकून दिला. महिनाभरानंतर मृतदेह पाण्यावर आल्यानंतर या भयंकर प्रकरणाचा उलगडा झाला.

शवविच्छेदनात परमेश्वर यांची हत्या झाल्याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्वंकष तपास करत असून आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

परमेश्वर तायडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन लहान मुलांसह वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोमठाणा गावात या घटनेने मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago