Officers and employees should work together to modernize the Maharashtra Maritime Board – Minister Nitesh Rane
मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या अद्ययावतीकरण व महसूल वाढीसाठी एकत्रित काम करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्री राणे यांच्या पाठपुराव्यास यश येऊन सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते मंत्रालयात मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.
यावेळी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, कॅप्टन खारा यांच्यासह सागरी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि जहाजाची प्रतिकृती देऊन मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.
सागरी मंडळातील सर्वच कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विभागाचा मंत्री म्हणून कर्मचाऱ्यांचा नेहमीच विचार केला आहे. कर्मचाऱ्यांनीही मंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजना तसेच नवनवीन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी काम करावे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास मंडळाचा महसूल वाढवण्याचे ध्येय लवकर साध्य करता येईल.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…