महाराष्ट्र

वन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार नाही, वन विभागाचा खुलासा

मुंबई : वन विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया टी.सी.एस.- आय.ओ. एन. यांच्यामार्फत 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षेद्वारे (ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न) घेण्यात येत आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिका शिफ्टनिहाय वितरण करणे, परीक्षा घेणे, निकाल प्रकाशित करणे याबाबतची टीसीएस आयओएन या कंपनीची यंत्रणा ही अत्यंत गोपनीय मजबूत व अत्यंत सुरक्षित आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या बातम्या निराधार, तथ्यहीन व चुकीच्या असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे.

वनविभागाची परीक्षा टी.सी.एस.आय.ओ.एन. या कंपनीकडून घेण्यात येत असून वनविभागाकडून परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावणे तसेच वरिष्ठांकडून परीक्षा केंद्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त उमेदवारांना व नागरिकांना https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावरूनही सूचनावजा आवाहन करण्यात आले असून अतिरिक्त दक्षता घेण्यात आली आहे. याचबरोबर नागपूर येथून परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची गंभीरतेने दखल घेऊन याबाबत सतर्क राहण्याबाबत पोलीस आयुक्त, नागपूर शहर, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक, वर्धा, पोलीस अधीक्षक, भंडारा व पोलीस अधीक्षक गोंदिया यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पोलीस विभागाच्या सायबर सेललासुद्धा सतर्क राहण्याचे व भरती प्रक्रियेसंदर्भात समाज माध्यमांमध्ये अफवा पसरवणाऱ्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या असल्याचे वनविभागाने कळविले आहे.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या घटना औरंगाबाद जिल्ह्यातील नेमून दिलेल्या सात परीक्षा केंद्रांवरील नसून ती खासगी ऍकेडमी असून त्याबाबत पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू आहे यामध्ये उल्लेखित राणा ऍकेडमी परीक्षा केंद्राचा वन विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रामध्ये समावेश नसल्याचे, वन विभागाने स्पष्ट केले आहे.

या परीक्षेदरम्यान गैरकृत्य करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध रीतसर पोलीस कारवाई करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. यासंदर्भात वन विभागाचे कक्ष अधिकारी वि. श. जाखलेकर यांनी खुलासा प्रसिद्धीस दिला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago