Newly appointed Consul of Singapore meets Home Minister Dilip Walse Patil
मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहु, असे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्र्यांना यावेळी सांगितले.
सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वांसाठी मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. सायबर गुन्हेगारी आणि फॉरेन्सिक सायन्स या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळावे, तसेच उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत, अशी अपेक्षा गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढील आठवड्यात सिंगापूर विमानसेवा लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांसाठी सुरु होत आहे. यासाठीही मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळावे असे ही वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी सांगितले. तसेच सिंगापूर राज्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, कम्युनिटी पोलिसिंग तसेच पोलिसांची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…