Sharad Pawar
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असून त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे. शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची नियमित तपासणी झाली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळून आला होता. आज तो अल्सर काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
दरम्यान, शरद पवारांची तब्येत चांगली असून ते रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावाही ते घेत आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच, ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरु करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…