महाराष्ट्र

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

नवी दिल्ली : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर केले असून, महाराष्ट्रातील चार शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट योगदानामुळे हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त केला आहे. शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, संशोधन आणि सामाजिक योगदानाद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली आहे. हा पुरस्कार 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने देशभरातील 27 राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेश आणि 6 संस्थांमधून 45 शिक्षकांची निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड येथील जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धपूर येथील डॉ. शेख मोहम्मद वकुओद्दीन शेख हमीदोद्दीन आणि लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ आर्टमधील डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे यांचा समावेश आहे. या दोन्ही शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या समर्पित कार्यामुळे हा पुरस्कार मिळवला आहे. निवड प्रक्रिया पारदर्शी आणि कठोर स्वरूपाची असून, ती जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांवर 23 जून ते 20 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पार पडली. एकूण 45 पुरस्कार विजेत्यांपैकी 24 पुरुष आणि 21 महिला शिक्षकांचा समावेश आहे.

उच्च शिक्षणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर
उच्च शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी देशभरातील 21 शिक्षकांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईतील शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. नीलाक्षी जैन आणि बारामती येथील एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्रा. पुरुषोत्तम पवार यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, उच्च शिक्षणातील प्रेरक आणि सक्षम प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2023 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. निवड प्रक्रियेत अध्यापन परिणामकारकता, समाजाभिमुख उपक्रम, संशोधन, नवोन्मेष आणि प्रायोजित संशोधन यासारख्या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. डॉ. जैन आणि प्रा. पवार यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन आणि सामाजिक योगदानामुळे हा पुरस्कार प्राप्त केला आहे.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

2 दिवस ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

2 दिवस ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

2 दिवस ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

2 दिवस ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

3 आठवडे ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

3 आठवडे ago