नाशिक

कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने शेती व्यवसाय विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येणाऱ्या काळात कृषी उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला निश्चित चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील उद्योजकांच्या संस्थांचे पदाधिकारी व संबंधित प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, सर्वश्री आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, हिरामण खोसकर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. तसेच उद्योजक, औद्योगिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उद्योजक व अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बोलतांना पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, कृषी, आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मिती या विषयांना शासन स्तरावर विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक उद्योग विकसित होत असून रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने नवीन प्रकल्पांची निर्मिती करणे व जुने बंद असलेले उद्योग पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. येत्या 15 दिवसात जिल्हाधिकारी, नाशिक महानगरपालिका आयुक्त, उद्योजक संस्थांचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांची समिती स्थापन करून समितीच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात औद्योगिक विकासाच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रात वीज, रस्ते, वाहतुक, औद्येगिक क्षेत्रातील अतिक्रमण, ट्रक टर्मिनल व्यवस्था व सांडपाणी प्रश्न तसेच कारखान्यांमधील औद्योगिक कचऱ्याचे व्यवस्थापन आदी प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच मानवेतेच्या दृष्टीकोनातून कामगार वर्गाला प्रोत्साहन देवून त्यांच्या सबळीकरणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago