नाशिक

फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर दोन दिवसांनंतर लाचलुचपत कार्यालयात हजर

नाशिक : आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या चौकशीनंतर फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी वैशाली झनकर लाचलुचपत कार्यालयात स्वतः हजर झाल्या आहेत. अटक पूर्व जामिनावर सुनावणी होण्यापूर्वी त्या एसीबी कार्यालयात दाखल झाल्या. आता त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल.

एका शिक्षण संस्थेच्या चार शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. या मंजूर अनुदानाप्रमाणे शाळेतील ३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची पदनिश्चिती करून त्यांचे नोव्हेंबर २०२० पासून थकीत वेतन काढून देण्यासाठी तसेच मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे वेतन पुढे नियमित पुढे सुरू ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या वतीने प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी तक्रारदाराकडे ९ लाखांची लाच मागितली. वैशाली झनकर यांनी तडजोडीअंती ८ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे एसीबीच्या पडताळणीत आढळून आले. तसेच पुढील व्यवहार त्यांचे शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर येवले यांच्याशी करण्याविषयी सांगितले होते.

मंगळवारी एसीबीने कारवाई करत शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या वतीने तक्रारदाराकडून ८ लाखांची लाच स्वीकारताना येवले याला रंगेहाथ पकडले. तसेच वीर आणि दशपुते यांनाही एसीबीने ताब्यात घेत तिघाविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर एसीबीने तिन्ही आरोपींच्या घरी छापे मारत घराची झडती घेतली. मात्र, त्यानंतर शिक्षणाधिकारी वीर या अचानक फरार झाल्या होत्या. तर येवले आणि दशपुते यांना न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago