नाशिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव इन्होवा कार दुभाजकाला धडकून शिर्डीचे चौघे ठार

नाशिक : मुंबईहून समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना भरधाव इन्होवा कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली. सिन्नरजवळील खंबाळे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात शिर्डी येथील चौघेजण ठार झाले. त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर खंबाळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजूकडे जाणारी अति वेगात असलेल्या इन्होवा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळली. इनोव्हा कारचे दरवाजे कटरने कापून मृतांना आणि जखमींना कारमधून बाहेर काढले. मृत व्यक्तींना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साह्याने उपचारासाठी रवाना करण्यात आले. यातील काही जखमी शिर्डी येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तर काही नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. हे सर्व शिर्डी येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण हज यात्रेकरूंना सोडून शिर्डीला परतत होते.

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्ती :

  1. रज्जाक अहमद शेख (वय ५५)
  2. सत्तार शेखलाल शेख (वय ६५)
  3. सुलताना सत्तार शेख‌‌ (वय ५०)
  4. फैयाज दगुभाई शेख (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गंभीर जखमी :

  1. जुबेर रज्जाक शेख (वय ३५)
  2. मैरूनिसा रज्जाक शेख (वय ४५)
  3. अझर बालन शेख (वय २५)
  4. मुस्कान अजहर शेख (वय २२)
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago