नाशिक

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 खाटांच्या क्रिटीकल केअर सेंटरसाठी 40 कोटी मंजूर

नाशिक : कोविड 19 साथीच्या आजाराने भारतालाच नव्हे तर जगाला हे दाखवून दिले आहे की आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतातील आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज असणे हे अति आवश्यक असल्याने यासाठी पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मंडविया यांच्या सहकार्याने आरोग्य खात्यांअंतर्गत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्यात नाशिकसाठी १०० खाटांचे अद्ययावत क्रिटीकल केअर हॉस्पिटल बांधणेसाठी ४० कोटींच्या निधी मंजूर करण्यात आला असून त्यास राज्य स्तरावरून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दिली.

तळागाळातील गरजू रुग्णांना सर्वसमावेशक व अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी नामदार पवार यांनी पी.एम.अभीम योजनेअंतर्गत नाशिक येथे क्रिटीकल केअर हॉस्पिटल मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले होते. यात प्रामुख्याने आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (ICU), आयसोलेशन वॉर्ड/ऑक्सिजन सपोर्टेड बेड, सर्जिकल युनिट यासारख्या सेवांनी सुसज्ज असतील. तसेच दोन लेबर, डिलिव्हरी, रिकव्हरी रूम (एलडीआर) एका नवजात केअर कॉर्नरसह इमेजिंग सुविधा, आहारविषयक सेवा, इत्यादी तसेच एकात्मिक सार्वजनिक आरोग्य लॅब भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य निदान चाचण्या एकाच छताखाली अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रयोगशाळेची क्षमता, अतिदक्षता विभाग, आयसोलेशन बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि व्हेंटिलेटर यासारख्या अत्यावश्यक सेवा गरजेच्या आहेत हे कोविड 19 साथीच्या आजाराने अधोरेखित केले आहे. त्यामुळे पंतप्रधान आयुषमान भारत पायाभूत सुविधा अभियानाअंतर्गत सक्षम रोग निगराणी प्रणालीचा विस्तार आणि निर्मिती, कोविड 19 आणि इतर संसर्गजन्य रोगांवरील समर्थन संशोधन प्रदान करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधांची क्षमता व सुसज्जता वाढवण्यासाठी मदत होणार आहे. संसर्गजन्य रोगांच्या पर्यवसानातून, साथीच्या काळात, किंवा आपत्कालीन परिस्थितींसह इतर कोणत्याही परिस्थितीसाठी गंभीर काळजीची गरज असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना करणार असल्याचेही ना.डॉ. भारती पवार यांनी सांगितले व देशासह महाराष्ट्र राज्य आरोग्य दृष्ट्या बळकट करण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल डॉ. पवार यांनी नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखजी मांडविया यांचे आभार व्यक्त केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago