महाराष्ट्र

धक्कादायक घटना! एसटीमध्ये चढण्यासाठी मुलांची धडपड, मुलाचा पाय बसच्या चाकाखाली आला, सुदैवाने विद्यार्थ्याचा जीव वाचला

नंदुरबार : नंदुरबार शहरातील बस स्थानकात बस पकडण्यासाठी शाळकरी मुलांची धडपड सुरू होती. बसमध्ये चढण्यासाठी मुलांचा गोंधळ सुरू होता. त्यावेळी बसमध्ये जाण्यासाठी धडपण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा पाय चाकाखाली आल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने विद्यार्थ्याला जास्त दुखापत झाली नाही.

बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थी बसच्या मागे धावत असतानाच त्यातील एक विद्यार्थी खाली पडला आणि थेट एसटीच्या मागील चाकात अडकला. त्याचा पाय बसमध्ये अडकल्याने त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. मात्र ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने त्या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात आलं. बसमध्ये पाय अडकून तो मुलगा बसखाली आला होता. थोडक्यात त्या विद्यार्थ्यांचा जीव वाचला. ही गोष्ट लक्षात आली नसती तर शालेय विद्यार्थासोबत मोठा अनर्थ घडला असता. नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथील तो विद्यार्थी आहे. सुदैवाने विद्यार्थ्याला थोडीशी दुखापत झाली. मात्र त्याचा जीव वाचला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago