महाराष्ट्र

देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन – केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत युवकांमध्ये क्रीडाप्रेम जागविण्यासाठी व निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातील ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली.

या संदर्भात झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत डॉ. मांडविया यांनी राज्यांच्या क्रीडा मंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय युवा कार्य व क्रीडा विभागाचे सचिव हरिरंजन राव उपस्थित होते. राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह विविध राज्यांचे क्रीडा मंत्रीही उपस्थित होते.

मंत्री डॉ. मांडविया म्हणाले की, युवकांचे आरोग्य सक्षम ठेवणे आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना प्रत्येक राज्याने सक्रिय सहभाग देऊन यशस्वी करावे.

या पंधरवड्यात २१ सप्टेंबर रोजी ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. तर, यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर : एकतेचा संदेश देणाऱ्या पदयात्रेचे आयोजन देशभर करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यांत तीन दिवस एकता, राष्ट्रप्रेम, एक भारत श्रेष्ठ भारत व विकसित भारत यांचा संदेश देणाऱ्या पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

दरम्यान, नशा मुक्त भारत अभियान राबविण्यात येणार आहे. देशभरातील १०० सामाजिक व अध्यात्मिक संस्थांचा सहभाग घेऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच संसद खेल महोत्सवाचे आयोजनही करण्यात येणार असून, राज्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी यावेळी केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

6 तास ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

2 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago