Nagpur Police Inspector suspended in Lady Homeguard Molestation Case
नागपूर : नागपूरमध्ये एका पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर महिला होमगार्डचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यावर ते कार्यरत असलेल्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका होमगार्ड महिलेने विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केली होती, त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अशोक मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…