Lockdown announced
कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली.
नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं कि, “लॉकडाउनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय लॉकडाउनच्या काळात खासगी कार्यालयं बंद राहणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालयं पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.”
नितीन राऊत यांनी पुढे सांगितलं कि, “भाजीपाला, फळे, मांस, मासे, अंडी विकत घेण्यासाठी दुकानं सुरु राहतील. लॉकडाउनमध्ये मद्यविक्री ऑनलाइन पद्धतीने सुरु राहणार आहे. तसंच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील. ओळखपत्र बाळगणं आवश्यक असेल. लसीकरण सुरु ठेवलं जाणार असून १३१ केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. नितीन राऊत यांनी यावेळी लोकप्रतिनिधी तसंच स्वयंसेवी संस्थांना लसीकरणासाठी लोकांच्या प्रवासाची सोय करण्याचं आवाहन केलं.
“घरी विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच राहावे यासाठी प्रशासनामार्फत अचानक भेट दिली जाईल. यावेळी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केला जाईल”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…