नागपूर

उद्योजकांनी कामगारांच्या आर्थिक अडचणींना विचार करुन सर्वमान्य तोडगा काढावा

नागपूर : सूतगिरणी आणि इतर कंपन्या, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कायमस्वरुपी आणि कंत्राटी कामगारांच्या विधायक मागण्यांचा साकल्याने विचार करुन त्यांच्या मागण्यांवर सर्वमान्य तोडगा काढावा. तसेच कामगारांनी कोविड काळात कंपन्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करुन कंपनी प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरुन दोघांनाही लाभ होईल, असे आवाहन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज केले.

विदर्भ सिंचन भवन येथील सभागृहात जिल्ह्यातील विविध उद्योगातील कामगारांच्या मागण्यांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी आणि कामगार या बैठकीला उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. असे असले तरीही उद्योजकांनी, कंपनी प्रशासनाने कामगारांच्याही विधायक मागण्यांचा विचार करुन त्यांनी शक्य होईल अशी अधिकाधिक मदत करावी. आणि सर्वमान्य तोडगा काढावा, असे आवाहन कडू यांनी यावेळी उद्योजकांना केले. उद्योग अडचणीत असला तरीही कामगारांना दैनंदिन गरजा भागवताना त्यांची आर्थिक कुचंबणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मागील थकबाकी लवकरात लवकर कामगारांच्या खात्यात जमा करावी. ही थकबाकीची रक्कम तीन किंवा चार टप्प्यात देताना सुरुवातीला अधिकाधिक ती रक्कम कामगारांना मिळेल, याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच कामगारांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक तोडगा काढून प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही दिले.

यावेळी सतरापूर गाव आणि कुही तालुक्यातील पुनवर्सित गावांमध्ये सौरऊर्जेची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करावा तसेच भूसंपादनांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच हा प्रस्ताव तयार करताना वस्तुस्थितीदर्शक बाबींवर आधारित असावा. या गावासाठी लागणारे भूसंपादन करण्यासाठी आवश्यक भूमी मिळण्यासाठी वनविभाग आणि जलसंपदा विभागांच्या जमिनीचा प्रस्ताव तयार करून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago