नागपूर

स्पर्धा परीक्षांसाठी दक्षिण नागपूरमधील ई-लायब्ररी हे महत्त्वाचे केंद्र बनावे – देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये या ठिकाणी ई – लायब्ररी उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. आज त्याचे प्रत्यक्ष रूप बघताना आनंद होत असून ही लायब्ररी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानेवाडा येथील लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत दक्षिण नागपुरात ई – लायब्ररीच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, सुधाकर कोहळे ,जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी व नगरसेवक उपस्थित होते. आमदार मोहन मते यांनी या लायब्ररीसाठी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण असून नागपूर विदर्भातील या पद्धतीची ही पहिली ई -लायब्ररी आहे. याचा निश्चितच तरुणाईला फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी शहरातील मोकळ्या जागांचा योग्य उपयोग होण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, ओपन जीम,खेळांची मैदाने, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा आणि गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, अभ्यासिका उघडण्याचे प्रस्ताव ठेवले होते. आज या ठिकाणी अशी एक सुंदर व्यवस्था निर्माण झाली असून या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी मानेवाडा ई -लायब्ररी केंद्र ठरत आहे. याचा आनंद आहे. गरज असल्यास विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची देखील व्यवस्था केली जाईल ,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी ई – लायब्ररीचे लोकार्पण जाहीर केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी अप्रतिम सुविधा निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक आहे.ज्ञान ही ऊर्जा असून ई- लायब्ररीच्या माध्यमातून ज्ञानाचे भांडार मानेवाडा परिसरात खुले झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला असून नागपूर सुधार प्रन्यास व आमदार मोहन मते यांचा पुढाकार कौतुकास्पद आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago