नागपूर

प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

नागपूर : सशक्त लोकशाहीमध्ये मतदानाचे पावित्र्य ठेवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे. याच्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही. नागपूर लोकसभेसाठी मागच्या वेळेस अवघे 54 टक्के मतदान झाले होते हे विसरता कामा नये. याचाच अर्थ 46 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन केले नाही. यावेळेस हे चित्र बदलविण्यासाठी सर्व मतदार राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण 75 टक्यांपर्यंत नेतील, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केला.

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वतयारीचा आज त्यांनी आढावा घेतला. बचतभवन येथे आयोजित केलेल्या या आढावा बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी तथा नागपूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, रामटेक लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर पाठोपाठ रामटेक मध्ये 64 टक्के मतदान मागच्या वेळेस झाले होते. मतदानाचे प्रमाण हे वाढले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी व्यक्त केली. मतदानाचे प्रमाण 75 टक्यांवर न्यायचे असेल तर मतदानाचा निर्धार हा शंभर टक्क्यांचा हवा. आदर्श गावांमध्ये शंभर टक्के मतदान होणे शक्य असून त्या दिशेने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी तथा नागपूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत सुरु केलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago