मुंबई

यामी गौतमच्या अडचणीत वाढ, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ED ने पाठवले समन्स

मुंबई : अभिनेत्री यामी गौतम विरोधात सक्तवसूली संचलनालयाने (ED) समन्स जारी केले आहे. परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याअंतर्गत तिची चौकशी केली जाणार आहे. ईडीला संशय आहे की यामीने काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी यामी विरोधात हे दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही, तर तिला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या आरोपात यामीला शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवले आहे. एजन्सीने यामीला फेमा अंतर्गत कथित अनियमिततेसंदर्भात आपला जबाब नोंदवण्यासाठी पुढच्या आठवड्यात त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की यामी गौतमला तिच्या खासगी बँक खात्यात 1.5 कोटी मिळाले आहेत, ज्याबाबत तिने स्पष्टीकरण दिलेले नाही. तिला 7 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

अलीकडेच आदित्य धरसोबत यामी गौतमचे लग्न झाले. यामीला एजन्सीने समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी तिला प्रथम समन्स बजावण्यात आले होते, परंतु त्यावेळी कोरोना निर्बंधांमुळे ती ईडी कार्यालयात जाऊ शकली नव्हती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

13 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago