मुंबई

तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा

मुंबई : महाराष्ट्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागानी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी WHO FCTC Artical ५.३ अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तंबाखू विक्री साठी परवाना देण्यासाठी नियमावली यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS) व टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय कार्यशाळा झाली.

राज्यात तंबाखू नियंत्रण कायदा 2003 व FCTC (Framwork convention on Tobaco control) article ५.३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता संबंधित विभाग व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये सहायक पोलिस महानिरिक्षक राजतिलक रोशन यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाचे पूर्णपणे सहकार्य राहील असे सांगितले. टोबॅको कंट्रोल, साऊथ एशीया, वाइटल स्टृटॅजी डॉ.राणा जे.सिंग यांनी १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी उपाययोजना? तसेच तंबाखु नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रत्येक विभागाची असल्याचे सांगितले.

डॉ.अर्जुन सिंग यांनी लहान वयात व्यसनास बळी पडल्यामुळे निर्माण होणारा कॅन्सरचा धोका याबाबत मार्गदर्शन केले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी महाराष्ट्रात ‘कोटपा’ (सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, याबाबत सविस्तर माहिती दिली. कायदेशीर तरतुदीनुसार तंबाखू क्षेत्रातील उद्योग आरोग्य संस्था व त्यांच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असतील तर संबंधित विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून कळवावे, असेही यावेळी सूचित करण्यात आले.

तंबाखू नियंत्रणावरील FCTC article 5.3 च्या मार्गदर्शक सूचना अधोरेखित करण्यात आल्या. या धोरणानुसार किरकोळ तंबाखू विक्रेत्यांची संख्या आणि तंबाखू उत्पादनाचे प्रकार मर्यादित करते. विशेषत: तरुणांना तंबाखूजन्य पदार्थांपासून रोखणे हा मुख्य उद्देश आहे.

कार्यशाळेसाठी आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग, महानगरपालिका, महसूल विभागाचे तसेच जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, हेलीस सेक्शेरीया इन्स्टिटय़ूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक, डॉ.प्रकाश गुप्ता टोबॅको कंट्रोल, साऊथ इस्ट, एशिया, वाइटल स्टृटॅजीस संचालक, डॉ.राणा जे.सिंग यांच्यासह टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, Tobacco control, vital strategies चे तांत्रिक सल्लागार डॉ.शिवम कपुर, oral public health department चे उपसंचालक डॉ.उमेश शिरोडकर, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन,टाटा मेमोरियल सेंटरचे प्रोजेक्ट अधिकारी डॉ..राहुल सोनवणे, NTCP चे कार्यक्रम अधिकारी किशोर गांगुर्डे, अध्यक्ष मनसुख झांबड, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले, डॉ.निकिता गायकवाड यांनी सूत्र संचालन केले व अन्नपूर्णा ढोरे यांनी आभार मानले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

12 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago