मुंबई

गार्डनमध्ये खेळताना पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : मुंबईच्या ॲन्टॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळताना खड्ड्यात पडून 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 12 वर्षीय यशकुमार चंद्रवंशी आणि 9 वर्षीय शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. ही मुले उद्यानात खेळत होती. मात्र, पाईपलाईन दुरुस्तीकरीता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. अँटॉप हिलमधल्या सेक्टर 7 परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या ॲन्टॉप हिल परिसरातल्या सेक्टर 7 मधल्या उद्यानात पाइपलाइन दुरुस्तीचं काम सुरु सुरु असून त्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या मैदानात खेळणारी दोन मुलं पाण्याच्या डबक्यात पडली. त्यानंतर त्यांना तात्काळ पाण्यातून बाहेर काढून सायन रुग्णालय, मुंबई येथे नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मयत घोषित केलं. मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर या मुलांची ओळख पटली.

दरम्यान, याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. नातेवाईकांकडून सीपीडब्लूडीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. घटनास्थळी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्यानं ही दुर्घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टरला ताब्यात घेतलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago