मुंबई

विलेपार्ले परीक्षा केंद्रावरील रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले येथे रसायनयशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपद्वारे प्रसारित झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करीत आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

शनिवार, दि. १२ मार्च २०२२ रोजी इयत्ता बारावीची रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटली अशा प्रकारच्या बातम्या समाजमाध्यमात आहेत. याबाबतची वस्तुस्थिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितली. इयत्ता बारावीची प्रश्नपत्रिका एसएससी बोर्डाच्या नियमानुसार १० मिनिटे अगोदर म्हणजे १०.२० वाजता प्रश्नपत्रिका वाचनासाठी वाटप करण्यात येते व प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिखाण १०.३० वाजता सुरू करण्यास सांगितले जाते. विले-पार्ले केंद्र क्रमांक ३६०१, मुंबई येथील केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर १०.२४ वाजता प्रश्नपत्रिकेतील काही भाग आढळून आला. या विद्यार्थीनीच्या मोबाईलमधील प्रश्नपत्रिकेच्या भागाची छाननी केली असता व्हॉट्सअॅपद्वारे काही भाग प्राप्त झाल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सखोल तपास करत आहेत.

अध्यक्ष, एसएससी बोर्ड यांनी केलेल्या चौकशीनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर म्हणजेच १०.२० वाजेनंतर मोबाईलवर आढळलेली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून प्रश्नपत्रिकेचा काही भाग प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रसायनयशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago