मुंबई

14 वर्षीय मुलीच्या गळ्यावर वडिलांनीच फिरवले ब्लेड; धक्कादायक घटनेने उडाली खळबळ

मुंबई : एका व्यक्तीने आपल्या झोपलेल्या 14 वर्षीय मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या पत्नीवरही त्याने हल्ला केला. या भीषण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी हनुमंत सोनवळला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना दहिसरमधील कोकणी पाडा परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत सोनवळ हा दारूच्या आहारी गेलेला असून तो पत्नी राजश्रीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असे. किरकोळ कारणांवरून होणारा वाद, मारहाण आणि मानसिक त्रास याला कंटाळून राजश्रीने काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली होती.

सोमवारी रात्री राजश्री वकिलांकडून घटस्फोटाच्या केससंदर्भात माहिती घेऊन घरी परतली. त्यावेळी हनुमंत याने तिच्यावर प्रश्नांचा भडिमार करत पुन्हा वाद घातला आणि पत्नी व मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. वाद वाढत गेल्यानंतर तो घराबाहेर पडला.

हनुमंत त्यानंतर रात्री उशिरा घरी परतला. रात्री सव्वादोनच्या सुमारास, मुलगी झोपेत असताना तिच्या गळ्याजवळ अचानक झालेल्या वेदनेने ती दचकून जागी झाली. तिला आपल्या वडिलांनी ब्लेडने वार केल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरड केली. मुलीचा आवाज ऐकून आई धावून आली असता, आरोपीने तिच्या पोटावरही ब्लेडने वार केला.

त्यानंतर नातेवाइकांनी पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली. जखमी मायलेकींना त्वरित शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दहिसर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

ही घटना कुटुंबातील तणाव, व्यसनाधीनता आणि घरगुती हिंसेचे गंभीर परिणाम अधोरेखित करते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago