मुंबई

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी त्यांना ४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागातील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने 1 ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 31 जुलै रोजी संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला होता आणि अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, नवीन चिन्ह पक्षासाठी नवी क्रांती घडवू शकते. ते म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची बाब अत्यंत चुकीची आहे, मात्र, निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. राजकीय पक्षाच्या आयुष्यात निवडणूक चिन्हे गोठवण्याचे प्रकार घडतात. काँग्रेससोबतही असे तीनदा झाले आहे. जनता पक्षाबाबतही ते झाले होते. नवे निवडणूक चिन्ह पक्षासाठी नवी क्रांती आणि नवा सूर्य आणू शकेल, असे राऊत म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago