Puducherry and Gadag Express collided at Matunga railway station in Mumbai, three coaches derailed
मुंबई : माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला आहे. एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. दोन ट्रेन समोरासमोर आल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गाडी क्रमांक ११००५ मुंबई दादर–पुडुचेरी चालुक्य एक्स्प्रेस या एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. आज रात्री १०.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही.
दादर-पुडुचेरी एक्स्प्रेस (11005) आणि गदग एक्स्प्रेस मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर एकाच रुळावर आल्यावर एकमेकांना धडकल्या. या अपघातात पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. गाड्यांचे डबे आदळल्याने ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यामुळे मोठा आवाजही ऐकू आला.
मध्य रेल्वेच्या सीपीआरओनुसार, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दादरहून पुद्दुचेरी एक्सप्रेस निघाली, तर गदग एक्सप्रेस सीएसटी येथून निघाली होती. ट्रॅक न बदलल्यामुळे गदग एक्स्प्रेसही पुद्दुचेरी एक्स्प्रेसच्या रुळांवर आली, त्यामुळे दोन्ही गाड्यांचे अनेक डबे एकमेकांवर आदळले. मात्र, दोन्ही गाड्यांचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातामुळे सध्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ही घटना रात्री उशिरा सव्वा दहाच्या सुमारास घडली.
माटुंगा रेल्वे स्टेशनजवळील अपघाताने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. घटनेनंतर तातडीने रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आहेत. माटुंगा रेल्वे स्टेशनजवळील अपघातान मुंबईबाहेर जाणाऱ्या सहा ते सात एक्सप्रेस गाड्यांवर याचा परिणाम होणार असून लोकल सेवेवरही परिणाम होणार आहे. तसंच अपघातामुळे जलद अप आणि डाऊन रेल्वे सेवा देखील बंद आहे. फास्ट ट्रॅकवरील सर्व लोकल स्लो ट्रॅकवर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्लो ट्रॅकवर मोठा भार आला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…