मुंबई

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविंद्र प्र. सुरवसे यांनी दिली. ही माहिती मुदतीत भरण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सेवायोजन कार्यालये कायदा १९५९ अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस सादर करणे बंधनकारक आहे. सर्व आस्थापनांकडून १०० टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांना यापूर्वीच यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या http://mahaswayam.gov.in संकेतस्थळावर लॉगिन करावे व कायद्याचे अनुपालन करावे, असे आवाहन केले आहे.

यासंदर्भात माहितीसाठी mumbaicity.employment@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालय, श्रेयस चेंबर्स, १ ला माळा १७५, डि.एन. रोड, फोर्ट मुंबई – ४००००१ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago