producer of 'Balkadu' Swapna Patkar arrested
मुंबई : मराठी चित्रपट निर्माती स्वप्ना पाटकर हिला अटक करण्यात आली आहे. स्वप्नाने क्लिनिकल फिजिओलॉजी या विषयात मिळवलेली पीएचडीची पदवी खोटी असल्याचं सिद्ध झालं आहे, त्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. खोटी पीएचडी पदवी दाखवून रुग्णालयात नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.
स्वप्नाने शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘बाळकडू’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता उमेश कामत याने मुख्य भूमिका साकारली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ता गुरदीप कौर सिंग यांना एप्रिल महिन्यात त्यांच्या कार्यालयात एक सीलबंद लिफाफा मिळाला होता. त्यात स्वप्नाच्या पीएचडी संबंधित काही कागदपत्र होते. ते पाहून गुरदीप यांनी स्वप्नाविरुद्ध २६ मे रोजी मुंबईतील वांद्रे येथे तक्रार दाखल केली आहे. त्या कागदपत्रांनुसार स्वप्नाने दाखवलेली छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालय, कानपुर येथील डिग्री खोटी होती. त्यानुसार तिच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या डिग्रीचा वापर करून तिने नोकरी मिळवली होती. ती २०१६ पासून वांद्रे येथील एका नामांकित रुग्णालयात सहाय्यक मनोवैज्ञानिक तज्ज्ञ म्हणून काम करत होती.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…