मुंबई

बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकर यांना अटक होण्याची शक्यता

मुंबई : मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे दरेकर यांची तात्काळ जामिनावर सुटका होणार आहे.

आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. प्रत्यक्षात मजूर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मजूर असल्याचं दाखवून आणि १९९९ पासून २०२१ पर्यंत मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर मजूर प्रवर्गातून निवडून येऊन नागरिकांबरोबरच सरकारचीही फसवणूक केली, अशा आरोपाखाली प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने या प्रकरणात अटक झाल्यास दरेकर यांची जामिनावर सुटका करण्यात यावी, असा निर्णय दिल्यामुळे दरेकर यांना दिलासा मिळाला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 महिने ago