मुंबई

NIA च्या टीमने केले मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या घटनेचे नाट्यरूपांतरण

अँटिलीया प्रकरणात मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास आता एटीएस कडून NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम रात्री उशीरा रेतीबंदर खाडीत त्या ठिकाणी गेली जिथे 5 मार्चला मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. मनसुख यांची हत्या रात्री झाली होती, त्यामुळे NIA पथक सचिन वाझे यांच्यासमवेत रात्री तेथे पोहोचले आणि त्यांनी गुन्हा घडला त्या दिवशीच्या संपूर्ण घटनेचे नाट्यरूपांतरण केले.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटिलीया प्रकरण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडण्याचा सचिन वाझे यांचा प्लॅन होता. त्यांना तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करायची होती. त्याने दुबईत राहणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित एका व्यक्तीला बनावट टेलीग्राम बनवून धमकी देणारा संदेश पाठविण्यास सांगितले होते. जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ मिळाल्यानंतर 12 दिवसांपर्यंत या प्रकरणाचा तपास वाझेच करत होते.

मात्र, या प्रकरणातील धमकीचे पत्र दिल्लीच्या तिहाड कारागृहातून पाठविले होते. यासाठी जैश-ए-हिंद नावाचे बनावट टेलीग्राम खाते तयार केले गेले. याचा तपास करण्यासाठी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका खासगी सायबर फर्मची मदत नोंदविली, परंतु हे सर्व कोठेही रेकॉर्डमध्ये समाविष्ट केले नाही. हा संदेश महत्वाचा असूनही मुंबई पोलिस तिहार कारागृहात का गेले नाहीत, याची चौकशी आता एनआयए करत आहे.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल टॉवर आणि आयपी मूल्यांकनाच्या आधारे असे आढळून आले आहे की, मनसुखच्या हत्येच्या वेळी वाझे तिथेच उपस्थित होता. नंतर, त्याने मुंबई पोलिस मुख्यालयातील सीआययू कार्यालयात जाऊन आपला मोबाइल चार्जिंगवर ठेवला, जेणेकरुन लोकेशन तिथे दाखवेल. तसेच वाझेने सांगितले कि 4 मार्च रोजी तो दिवसभर आयुक्त कार्यालयात होता, परंतु, 4 मार्चला दुपारी 12:48 वाजता त्याचे मोबाईल लोकेशन चेंबूरच्या एमएमआरडीए कॉलनीतले होते.

एटीएसने अटक केलेले नरेश गोरे आणि माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांना एनआयएकडे सुपूर्द करण्यात आले आहे, त्यानंतर केंद्रीय अन्वेषण एजन्सी सचिन वाझे आणि या दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करू शकते. मनसुखची हत्या झालेली कार एनआयएच्या ताब्यात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago