Mumbai Local derails at CSMT, no injuries reported
मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनचा मंगळवारी विचित्र अपघात झाला. सकाळी सीएसएमटी येथे एक लोकल रुळावरून घसरली. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात (CSMT) हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन बफरला धडकली. सकाळी फलाट क्रमांक १ वरून ट्रेन मागे घेत असताना अचानक अपघात घडला.
सिग्नल दिल्यानंतर ट्रेन पुढे जाण्याऐवजी मागे गेली. त्यामुळे लोकल ट्रेन थेट बफरला जाऊन आदळली. त्यानंतर ट्रेनचे दोन डबे रुळांवरून खाली घसरून एका बाजूला कलंडले. ट्रेन रूळावरून घसरल्यानंतर काही डबे प्लॅटफॉर्मला धडकले. त्यामुळे सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सध्या हार्बर रेल्वेमार्गावरील एकाच बाजूची वाहतूक सुरु आहे.
सध्या लोकल ट्रेन रुळावर आणून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सीएसएमटी स्थानकात हार्बर रेल्वेसाठी दोन फलाट आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्यानं एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत असल्याने प्रवाशांनी मध्य रेल्वेमार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…